काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही; पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या विजयामुळे मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. हा विजय निश्चित होताच. यापूर्वी इतर काही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतही पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या पराभवाची मालिकाच सुरु झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. दिल्लीत आपचा विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षानं दिल्ली पुन्हा राखल्याचं चित्र आहे. सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा दावा निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ६२ जागी तर, भाजप अवघ्या ८ जागी आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत.
पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Web Title: Do not take MNS Chief Raj Thackerays speeches seriously says NCP Chief Sharad Pawar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं