#ब्रेकिंग: राज यांच्या ईडी समन्सवर स्वाक्षरी करणारा तो अधिकारी अमित शहांचा फेसबुक फॉलोवर?

मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. दरम्यान, आजच्या चौकशीत नक्की किती वेळ लागणार हे निश्चित सांगता येत नसलं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. काल पासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
दरम्यान, २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता. मात्र यानंतरही कार्यकर्ते कायदा हातात घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरम्यान, आज सकाळी संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मात्र दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं म्हणून राणा बॅनर्जी (असिस्टंट डिरेक्टर ईडी) या ईडीच्या अधिकाऱ्याने समन्स बजावलं आणि त्यांच्या स्वाक्षरीची तारीख १६ ऑगस्ट २०१९ अशी असल्याचं समजतं. मात्र अधिक ऑनलाईन चौकशी केली असता असिस्टंट डिरेक्टर ईडी राणा बॅनर्जी हे फेसबुकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फॉलो करत असल्याचं समोर आलं असून त्यांनी अमित शहांच्या पेजला लाईक सुद्धा केलं आहे. विशेष म्हणजे ते राजकीय व्यक्तींमध्ये केवळ अमित शहांनी फॉलो करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
कोण आहेत ते ईडीचे अधिकारी?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं