मुंबई खार रोडवर ५ माजली इमारतीचा भाग कोसळला; बचावकार्य सुरु

मुंबई: मुंबईतील खार रोड येथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे.
पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.
Mumbai: A part of a staircase of a building collapsed in Khar (West), today. No injuries have been reported.
— ANI (@ANI) September 24, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं