आज लाडक्या गणपती बाप्पाच वाजत गाजत विसर्जन, सर्व सरकारी यंत्रणा सज्ज

मुंबई : न्यायालयाने घातलेली डीजे तसेच डॉल्बीवर बंदी आणि पुण्यासारख्या शहरात त्यामुळे मिरवणुकीवर अनेक गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकला आहे. त्यापाठोपाठ नगर मध्ये सुद्धा तेच अस्त्र अनेक मंडळांनी उपसलं आहे. पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ते पाऊल गणेश मंडळांनी उचललं आहे. वास्तविक बंदीचा निर्णय न्यायालयाने घेतल्याने, त्यात पोलिसांना दोष कितपत द्यावा हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे.
त्या सर्व अनुषंगाने रविवारच्या अनंत चतुर्दशीला गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एकूणच सरकारी आणि पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचा आढावा घेतल्यावर यंदाच्या विसर्जन मिरवणुका ‘शांतते’त पार पडण्याची चिन्हे आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंदाजे अडीजशे मंडळांनी डीजेचा वापर पूर्ण बंद करून बॅन्जो, कच्छी बाजा, ढोल-ताशा हे पर्याय स्वीकारले आहेत. पोलिसांना संपूर्ण सहकार्य करीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचा निर्णय बहुतांश मंडळांनी शनिवारी झालेल्या विसर्जन नियोजन बैठकीत घेतला. त्यामुळे मिरवणुकांतील आवाज मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान. प्रवासादरम्यान अनेक विसर्जन मार्गांवर मेट्रोची कामे सुरू असल्याने तेथून मिरवणूक सुरळीत पुढे नेण्याचे आव्हान पेलण्यासाठी मंडळांसोबतच पोलिस, पालिका प्रशासनही सज्ज आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासन, पोलिस, पालिकेने अशा ठिकाणी नियोजनही केले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणशोत्सव मंडळांतील बाप्पांसह शहरातील घरगुती गणपतींचेही विसर्जन होणार असल्याने गिरगाव, दादर, जुहू या मुंबईतील मुख्य चौपाट्यांसह अन्य सुमारे १०० विसर्जनस्थळी पालिकेचे हजारो कर्मचारी दिवसरात्र नियोजनासाठी तैनात असतील. यासाठी २४१७ अधिकाऱ्यांसह ६,१८७ पालिका कामगार कर्तव्यावर रुजू असतील असं पालिका प्रशासनाने कळवलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं