नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका

मुंबई, ९ ऑगस्ट : नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही कामधंदा उरलेला नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. नाणार प्रकल्पाला ८० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जातो. मात्र, यामागे शिवसेनेचा केवळ पैसे कमावण्याचा हेतू आहे, असे राणे यांनी म्हटले होते.
नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
मालवण वायंगणी- तोंडवळी येथील नियोजित सी- वर्ल्ड प्रकल्प कमीत कमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे. पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय किंवा खाजगी संस्थेंमार्फत प्रकल्प उभारु, अशी माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच नाणार प्रकल्प शिवसेनेसाठी संपलेला आहे. मात्र तरीही काहीजण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करत आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.
News English Summary: Narayan Rane is a well-educated unemployed politician, he has no job left. They say something in a moment, then say something. Gulabrao Patil has criticized that no one pays attention to him without speaking.
News English Title: Gulabrao Patil Slams BJP Leader Narayan Rane On His Comment About Nanar Project And Shivsena News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं