गांधींना मारणारा हिंदूच होता; १५% मुस्लिमांच्या नावाने ८५% हिंदूंना भीती दाखविण्याचा प्रयत्न

पुणे: नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमविरोधी आहेच, पण तो प्रत्येक गरीबाच्या विरोधात आहे, असं विधान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदूंना भीती दाखवून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
‘केंद्र सरकारनं केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही आहे,ट अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली. देशात सध्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत. पण संविधानात जात, धर्म, लिंगावरून भेदभाव केला जात नाही, अशा गोष्टींना संविंधानात थारा नाही असं सांगत उर्मिला यांनी सीएए रद्द करण्याची मागणी केली.पुण्यातील गांधीभवनमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सीएएवरून केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.
पुढे मातोंडकर म्हणाल्या, ‘ महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा आपण भाग आहोत, हा अभिमानाचा भाग आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांनाही गांधीजींना अभिवादन करायला राजघाटावर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. भारतीयता सर्वांच्या नसानसात आहे. अहिंसेविरुद्ध काहीही चालू देऊ नका. केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, हे या कायद्याच्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले ‘
‘लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हे तर नागरिक होत. फॅसिझम फक्त अहिंसेपुढेच झुकेल. भारत हा गांधी विचारांचा देश आहे. ही ओळख पुसू देऊ नका. हा कायदा भारतीयत्वाला ललकारणारा आहे. या लढ्यात आग विझवणाऱ्या चिमणीप्रमाणे प्रत्येकाने योगदान द्यावे,’ असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.
Web Title: Hindu murder the Mahatmha Gandhi says congress leader Urmial Matondkar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं