सरकारचं ‘झाडे लावा, झाडे जगवा’ जुनं झालं; आता 'कर्फ्यू लावा, झाडे पाडा'

मुंबई: शनिवार, रविवारच्या धुमश्चक्रीनंतर आरेमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, ती अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी निषेध नोंदवला असून, ‘आरेमध्ये नेमकी कोणती देशद्रोही कारवाई होण्याची शक्यता आहे की ज्यामुळे तिथे सरकारला रविवारीही जमावबंदी कायम ठेवावी लागली?’ असा प्रश्न हे मुंबईकर करत आहेत.
मुंबईमध्ये वांद्रे, महापालिकेच्या मुख्यालय, पवई येथे आरेमधील तोडलेल्या झाडांसाठी निदर्शने करण्यात आली. पर्यावरणप्रेमी मुंबईकर ठिकठिकाणी आरेमधील झाडे तोडण्याच्या विरोधात निषेध व्यक्त करत आहेत. त्यामुळे तोडलेल्या झाडांबद्दलचा संताप केवळ आरेमध्येच व्यक्त व्हावा अशी जागेची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आरेमध्ये रविवारीही आदिवासींना त्रास झाला. आदिवासी पाड्यांजवळ बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यांना आपली ओळखपत्रे घेऊन फिरावे लागत आहे. ही जमावबंदी नेमकी कशासाठी आणि किती काळ याचे उत्तर पोलिस स्पष्टपणे देत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली.
आरेमध्ये जमा झालेले सर्वजण हे केवळ निषेध नोंदवण्यासाठी आलेले असताना त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे घटनात्मक अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी भूमिका यावेळी पर्यावरणप्रेमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मांडली. उच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु असतानाच झाडे तोडण्याची कारवाई करण्याची घाई का करण्यात आली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
तसेच पोलिसांनी पर्यावरणप्रेमींवर कारवाई करताना नियमांचा भंग केला असून त्याबाबत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे शाळेमध्ये शिकवले जाते, कारशेडच्या ठिकाणी शुक्रवारी एकत्र आलेले पर्यावरणप्रेमी हेच काम करत होते. मग हा गुन्हा आहे का?’ असा प्रश्न आरेमधील रहिवाशी प्रकाश भोईर यांनी यावेळी केला. त्यांच्या पत्नीला शनिवारी तुरुंगात पाठवण्यात आले होते. या कारवाईनंतर आरेमध्ये अजूनही पोलिसांचे बंधन असून, आदिवासींना एका पाडय़ावरुन दुसऱ्या पाडय़ामध्ये जाण्यासाठी जंगलाचा वापर करावा लागत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आज सुप्रीम कोर्टात सुनावणी;
आरेमधील झाडे तोडण्याविरोधात आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्या पत्राची दखल घेतली असून सोमवारी तातडीने आरेबाबत सुनावणी ठेवली आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतली जाण्याची शक्यता आहे.
कुटुंबियांची पत्रकार परिषद;
मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करताना अटक झालेल्या २९ जणांच्या कुटुंबियांनी रविवारी गोरेगावमध्ये पत्रकार परिषद देखील घेतली होती. मुंबई पोलीसांनी चुकीच्या पद्धतीने २३ पुरूष आणि ६ महिलांना अटक केल्याचा आरोप या परिषदेत करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांसह स्थानिक आदिवासींचाही समावेश आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं