राज्य सरकारकडून काही विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीबाबत विचार

पुणे, २ जुलै : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. पुढच्या महिन्याचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मदत-पुनर्वसन, आरोग्य व अन्य दोन असे चार विभाग वगळून इतर सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे,’ असं वडेट्टीवार म्हणाले. ‘कोरोनाच्या लढाईत आघाडीवर राहून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कुठलीही कपात केली जाणार नाही,’ अशी ग्वाही देखील त्यांनी केली.
News English Summary: The government plans to cut the salaries of government employees in all but four departments, namely relief-rehabilitation, health and two others. Wadettivar said that this was discussed in the meeting with the Chief Minister and Deputy Chief Minister.
News English Title: Maharashtra government employee may have to face salary cut hints relief and rehabilitation Minister Vijay Wadettiwar News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं