अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर

मुंबई, 8 ऑगस्ट : सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर त्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याच विषयावरून स्वतःची भूमिका आधीच मांडण्यास सुरुवात केली आहे.
समाज माध्यमांवर आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध तर अभियान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातील काही अभियानं ही ट्विटरवर सलग काही दिवस ट्रेंडिंगवर होती हे देखील पाहायला मिळालं. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांचं आदित्य ठाकरे हे एकमेव लक्ष असल्याचं पाहायला मिळत असून सुशांत प्रकरणच त्यांच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पोलिस तपासात कोणालातरी वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार काम करीत असल्याची लोकांची भावना आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत, तर राज्य सरकार बरखास्त होईल, एवढे लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
सुशांत प्रकरणी तपासाला येणाऱ्या CBI अधिकाऱ्यांना quarantine करण्याची धमकी देणाऱ्या महापौरांचा बोलविता धनी कोण हे जनतेला ठाऊक आहे. लोकांच्या मनात असलेला संशय पक्का होत चालला आहे? हा आटापिटा कोणाला वाचवण्यासाठी आहे हे जनतेला कळते आहे.@OfficeofUT @republic @MiLOKMAT @TV9Marathi pic.twitter.com/BGODpYjss0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 8, 2020
सुशांतसिंहच्या आत्महत्याप्रकरणी रोजच आरोप- प्रत्यारोप, खुलासे प्रतिखुलासे होत असून आज महापौरांच्या विधानानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असूनही सीबीआय वा बिहारच्या तपासी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची शिवसेना नेत्यांची धडपड सुरुच आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. अशी दडपशाही चालवून घेणार नाही, असेही भाजप नेते सांगत आहेत. पण या वादावादीमुळे यात खरेच कोणालातरी वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे का, तसेच उलटपक्षी कोणाला उघडे पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे का, एवढी लपवालपवी सुरु आहे म्हणजे कोठेतरी पाणी मुरते आहे का, अशीही चर्चा लोकांमध्ये असल्याचे मत भातखळकर यांनी व्यक्त केले.
News English Summary: People feel that the entire state government is working to save someone in the police investigation into the suicide of actor Sushant Singh Rajput. BJP MLA Atul Bhatkhalkar has warned that if the Supreme Court order is not complied with in this case, the state government will be sacked.
News English Title: Maharashtra government will be dismissed if Supreme Court orders not followed in Sushant Singh Rajput case said MLA Atul Bhatkhalkar News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं