रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज

मुंबई : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
त्याचाच प्रत्यय असा आला की, त्यामुळे सोशल मीडियावर संपाची हाक देत एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाविरोधात अचानक एल्गार पुकारला आहे. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. जसे हाल प्रवाशांचे तसेच हाल एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे सुद्धा होत आहेत असं कर्मचारी बोलून दाखवत आहेत.
जर परिवहन मंत्री दिवाकर रावते तोडगा काढण्यात अपयशी ठरले तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा हा संप अजून चिघळू शकतो अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे हा संप अजून सुरु असला तरी याची जवाबदारी घेण्यास कोणतीही एसटी संघटना पुढे येताना दिसत नाही. राज्यातील जवळ जवळ ८० टक्के एसटी आगार आणि त्यातील कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं