ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील ४३,६६५ गावांपैकी २६,३४१ खेडी आणि १२,९५६ वस्त्या-वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचार्ई आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ‘पाणी – बानी’ सारखी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. घशाची कोरड वाढू लागण्याने ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हैराण होण्याची चिन्हं आहेत.
राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून त्या पाणीटंचाईवर उत्तर शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५७३.१३ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. हा निधी २६,३४१ खेडी आणि १२,९५६ वाड्यांसाठी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, नवे बोअर घेणे, बोअरची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे खासगी विहिरी अशा विषयांचा समावेश आहे.
पीडब्ल्यूएस म्हणजे नळपाणी पुरवठा योजनांवर लक्ष देण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहेत. आर्सेनिक आणि फ्लोराइड प्रभावित भागांना यात प्राधान्य देण्यात यावे, तसेच अर्धवट राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं