लॉकडाउनमुळे नोकऱ्या गेल्याने मराठी तरुण आत्मविश्वासाने स्वतःच्या उद्योगांकडे

मुंबई, १६ जुलै : अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, ‘रडायचे नाही लढायचे’, हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.
प्रसाद भोसले हा तरुण मुंबईतील एका शाळेत फुटबॉल कोच म्हणून नोकरीला होता. मात्र लॉकडाउनमुळे शाळेने देखील तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलं. मात्र त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा प्रसादने मुंबईत एक गाळा भाड्याने घेऊन त्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय मोठ्या आत्मविश्वासाने करत आहे आणि त्यात त्याला आनंद देखील मिळतो आहे असं तो म्हणाला.
Mumbai: Prasad Bhosale, a football coach, is selling vegetables now as he struggles to make ends meet amid #COVID19 outbreak; says, “I was a Physical Education Teacher at a school, but due to lockdown, I was fired. So, I started selling vegetables, it has been 2 months now.” pic.twitter.com/8jJ51hj95W
— ANI (@ANI) July 16, 2020
दुसरीकडे मुंबईतील सागर पवार हा मूळचा इंजिनिअर एमबीए. लॉकडाउनच्या काळामध्ये त्याने मासेविक्री सुरू केली. यातील बारीक खाचाखोचा समजून घेतल्या आणि उत्तम दर्जा आणि योग्यवेळेत दिलेल्या डिलिव्हरीच्या बळावर त्याने हा व्यवसाय आता वाढवला आहे. तो सांगतो, नोकरीपेक्षाही चांगला नफा आता या छोट्या व्यवसायामध्ये मिळतो. लॉकडाउनच्या काळाला मी संधी मानली. उन्हाळ्याचे दिवस होते. लोकांना चिकन खाण्याची इच्छा कमी झाली होती. मटणाचे दर परवडणारे नव्हते. बाजार बंद होते, अशावेळी ताजी फडफडीत मासळी त्यांना घरपोच दिली की ग्राहकही खूष झाले. त्यांच्याकडून येणारा प्रतिसाद वाढता आहे. त्यामुळे एकूणच मराठी तरुणांमुळे सुप्त रूपात असलेली उद्योजकता कोरोना आपत्तीमुळे समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे.
News English Summary: Prasad Bhosale, a football coach, is selling vegetables now as he struggles to make ends meet amid COVID19 outbreak; says, “I was a Physical Education Teacher at a school, but due to lockdown, I was fired. So, I started selling vegetables, it has been 2 months now.”
News English Title: Marathi Youngsters now moving to business after losing jobs in lockdown News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं