प्रामाणिक पत्रकारितेवर भ्याड हल्ला; मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक

मुंबई: प्रामाणिक पत्रकारिता आणि विशेषकरून व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यमांची सातत्याने मुस्कटदाबी होताना दिसत आहे. तशीच घटना रवींद्र आंबेकर आणि निखिल वागले यांच्या टीमने मॅक्समहाराष्ट्र’च्या बाबतीत अनुभवली आहे. कारण मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दरम्यान, या संदर्भात सामान्य वाचक तसेच राजकारणातील व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, आमदार कपिल पाटील अशा अनेक राजकीय दिग्गजांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून या मुस्कटदाबी विरुद्ध रोष व्यक्त केला आहे. संबंधित हल्ला हा मॅक्समहाराष्ट्र’वर नसून थेट पत्रकारितेवरील हल्ला असल्याने महाराष्ट्रानामा न्यूज’च्या टीमने देखील याचा निषेध केला आहे. दरम्यान, हे कृत्य भ्याड आणि निंदनीय आहे. त्यामुळे सरकारने दोषींवर कारवाई करावी, अशी माझी मागणी सर्वच थरातून करण्यात आली आहे. मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ नोव्हेंबर २०१९ ला ८ वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं.
दुसरी संतापजनक गोष्ट म्हणजे मॅक्समहाराष्ट्र’चे हिंदी व्हिडीओ अपलोढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मॅक्समहाराष्ट्र हिंदी या अकाउंटवर पॉर्न व्हिडिओ अपलोढ करण्यात आले आहेत. त्यामुळं या चॅनेल’ला देखील यूट्युबने कॉपी राईट पाठवला आहे. त्यामुळं आता हे चॅनेल देखील यूट्यब कडून बंद केलं जाण्याची शक्यता आहे.
आज मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. आज साधारण ८ वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी मॅक्समहाराष्ट्राचे व्हिडीओ दिसत नाही असं अनेकांनी फोन करुन त्यांच्या टीमला कळवलं आहे. मात्र मॅक्समहाराष्ट्रने सर्व प्रेक्षकांना विनंती करत, तुम्ही पुढील व्यवस्था होईपर्यंत मॅक्समहाराष्ट्र चे सर्व व्हिडीओ मॅक्समहाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर पाहू शकतात अशी विनंती केली आहे. मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने योग्य ती कायदेशीर आणि नियमानुसार पावलं उचलली आहेत आणि लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं