इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अशोक चव्हाण यांच आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल” असं आव्हाड म्हणाले होते.
दरम्यान, आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. @Awhadspeaks यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2020
त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना इंदिरा गांधी यांना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांबाबत वादग्रस्त विधानं सुरूच आहेत. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. मग त्यानंतर करीम लाला इंदिरा गांधींना भेटायचा असं संजय राऊत म्हणाले. आणि आता आव्हाडांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
Web Title: Minister Ashok Chavan reply to Jitendra Awhad over statement made against former PM Indira Gandhi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं