वडाळा: भाजपाची कालिदास कोलंबकरांना उमेदवारी; सेनेच्या श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. दरम्यान ब्राह्मण समाजाचा तीव्र विरोध असताना देखील चंद्रकांत पाटलांना कोथरूड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महिलांबाबत अत्यंत संतापजनक वक्तव्य करणारे घाटकोपरचे आमदार राम कदम याना पुन्हा तिकीट दिल्याने समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
दरम्यान, वडाळा मतदारसंघातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जात असल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी श्रद्धा जाधव यांनी खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती. वडाळा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास श्रद्धा जाधव बंडाच्या तयारीत होत्या आणि त्यासाठीच त्यांनी मातोश्रीवर फेऱ्या मारल्या होत्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं