रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत अमित ठाकरे व मनसे शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांची आज भेट घेणार

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली रेल्वेसेवा आसपासच्या शहरांमधील प्रवाशांचा देखील दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दरम्यान याच सेवेचा लाभ घेणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती लोकसभा आणि त्या तुलनेत रेल्वेच्या कमी फेऱ्या देखील त्यामागील मुख्य कारण आहे. मात्र त्यात विशेष अडचणी या महिलावर्गाला आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रत्यक्ष रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांचे विविध प्रश्न आणि समस्यांबाबत चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविणार असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी देखील अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष मुंबई लोकलने प्रवास करून सामान्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. एल्फिन्स्टन दुर्घटनेदरम्यान अनेक निरपराध मुंबईकरांचा जीव गेला होता आणि त्यावेळी स्वतः राज ठाकरे यांनी प्रवाशांच्या प्रश्नाला हात घालून सरकारला फैलावर घेतले होते. त्यात पावसाळ्यामध्ये प्रवासादरम्यान अपघातांचे प्रमाण अधिकच वाढते आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या समस्येसोबत इतरही अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नैतृवाखाली एक शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांच्या भेटीला पाठविण्याचा निर्णय घेतला होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या भेटीबाबत अधिक तपशील प्राप्त होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं