राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत राजगडवर बैठक; त्यानंतर विभागाध्यक्षांशी; लवकरच निर्णय जाहीर होणार?

मुंबई: निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठकही घेतली होती. यामध्ये निवडणूक लढवावी अथवा नाही यावर पक्षातील नेत्यांची मतं राज ठाकरेंनी जाणून घेतली. यावेळी जर मनसे निवडणूक लढणार नसेल तर इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते पक्षापासून दूरावण्याची शक्यता वर्तविली होती.
निवडणूक जवळ आल्याने आघाडी आणि युतीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शांत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मनसे काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. आज सकाळी मनसेचे कार्यालय राजगड येथे राज ठाकरेंनी नेते आणि सरचिटणीस यांची बैठक बोलवली होती.
आज होणाऱ्या मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत. मनसे विधानसभेला किती जागा लढविणार? इच्छुक उमेदवारांच्या यादीची चाचपणी करण्याचं काम सुरु आहे. मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते मात्र राज ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या बैठकीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं