मनसेच्या ९ तारखेच्या भगव्या मोर्चा वेळी राज ठाकरेंचं भाषण देखील होणार: सविस्तर

लातूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज लातूरला महाराष्ट्र सैनिकांनी भरवलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाला उपस्थिती दर्शवली आहे. संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पक्षातील उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना एका छोटेखानी भाषणात संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम चांगल्या प्रकारचं कृषी प्रदर्शन मराठवाड्यात भरवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानले.
राजमुद्रित ध्वजाखाली पक्षाचा पहिला भव्य उपक्रम… तोही शेतकऱ्यांसाठीचा!
मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहून महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.#शेतकऱ्यांचीमनसे? pic.twitter.com/Fh1sUVuW39
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 1, 2020
पुढे उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी आहे. जो केवळ महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणातच आपल्याला सापडतो. महाराष्ट्रातल्या माझ्या प्रयोगशील शेतकऱ्याला या सगळ्या प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग आणि फायदा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समोर स्वतः शेतकरी उपस्थित असल्यानं शेतीविषयी मी माझं जास्त ज्ञान पाजळू शकत नाही. पण राज्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असं जाहीर आवाहन राज ठाकरेंनी उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी केलं.
पुढे ते म्हणाले की मी तुमचा आज थोडासा भ्रमनिराश करणार आहे. कारण सर्दी, खोकला झाला आणि माझी तब्येत थोडी ढासळली, कारण मुंबईसारख्या भागात थोडीशी लागणच आहे. तब्येत खराब असल्यानं जास्त बोलताना मला प्रचंड त्रास होतो. आज देशात जे काही घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी ९ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने मी येथील सर्व उपस्थितांना मोर्चासाठी जाहीरपणे आमंत्रित करतो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी तिथे येणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ते तुमचं कर्तव्य देखील आहे. त्यादिवशी तिथे मोठं भाषण करावं लागणार असल्यानं माझा घसा ढणढणीत बरा करण्यासाठी जरा वेळ लागेल. मी एक तारखेला म्हणजे उदघाटनाला येऊ शकलो नाही, परंतु ९ तारखेला मुंबईत मोर्चा झाल्यानंतर माझा पहिला दौरा मराठवाड्यात आहे. त्यावेळी मराठवाड्यात आल्यानंतर आपणा सगळ्यांना निश्चित भेटेन आणि बोलेन, असं देखील राज ठाकरे म्हणाले.
Web Title: MNS Chief Raj Thackeray will address the participants of Morcha organised on 9th February in Mumbai.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं