लवकरच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूनं झुकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मा. शरद पवार साहेबांना भेटून शुभेच्छा दिल्या pic.twitter.com/U2tUsyxegk
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 30, 2019
संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. परंतु शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी १८ हजार ६४७ च्या मताधिक्याने देशपांडेंना पराभूत केलं. संदीप देशपांडे ४२ हजार ६९० मतं मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेस उमेदवार प्रविण नाईक तिसऱ्या क्रमांकावर होते. माहीममध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे गणित बिघडल्याचा दावा देशपांडेंनी केला.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीबाबत शरद पवार यांनी भेटीमध्ये माहिती घेतली. माहीममध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभवाची कारणंही पवारांनी जाणून घेतली. माहिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थिती चांगली आहे, अशी माहिती पवारांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळेल, अशी त्यांना आशा होती.
विधानसभा निडणुकींसंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये पवारांनी जनतेला भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करायचे असल्याचे मत व्यक्त केलं. “भारतीय जनता पक्षाविरोधात जनतेला मतदान करायचं असलं तरी विरोधी पक्षांची आघाडी अद्यापही विस्कळीत असल्याने अपेक्षित लक्ष्य गाठण्यात अपयश आले,” अशी खंत पवारांनी देशपांडेसमोर बोलून दाखवली. तसेच “पुढील काळात सर्व विरोधी पक्षांना एकजूट दाखवावी लागेल,” असंही पवार देशपांडे यांना म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं