राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान 'जेम्स'चं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला

मुंबई, २९ जून | राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान जेम्सचं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला pic.twitter.com/yP2AOv4Hrb
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 29, 2021
जेम्स जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. दरम्यान, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू हे श्वान आहेत.
२०१८ मध्ये राज ठाकरेंच्या बॉन्ड या कुत्र्याचंही निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून बॉण्ड हा राज ठाकरे यांच्यासोबत होता. राज ठाकरे यांनी स्वतः परळच्या स्मशानभूमीत बाँडला अखेरचा निरोप दिला होता.राज ठाकरे यांचे श्वानप्रेम लोकांच्या परिचयाचं आहे. कृष्णकुंज या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून हे कुत्रे पाळण्यात आले होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: MNS Chief Raj Thackeray’s dog James passed away news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं