मनसेच्या व्यासपीठावर वीर सावरकरांची प्रतिमा; राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडणार?

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नव्या झेंड्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलरचा रंग देखील बदलणार आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगव्या रंगाचा मफलर दिसणार आहे. काल बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोगेश्वरी येथील जय जवान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना उद्या झेंड्यासोबत हा मफलरही बदलणार असे सांगितले.
दरम्यान, आज मनसेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबत स्वातंत्रवीर सावरकर यांचा फोटो देखील ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशभरात सावरकरांच्या नावाने मोठं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरून शिवसेना देखील कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळले होते. विशेष म्हणजे काँग्रेसने तर सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही थेट सत्तेचा देखील त्याग करू, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना राज्यात सावरकरांना भारतरत्न देण्यावरून भाजपच्या अजेंड्यावर गेल्यास राज्यात काँग्रेस कोणताही निर्णय घेऊ शकतं अशी शक्यता अधिक आहे.
मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून देशभरात राजकारण तापलं तरी मनसे अध्यक्ष पूर्वीपासूनच स्वातंत्रवीर सावरकरांची उदाहरणं सभेतील भाषणात मांडण्यात आली आहेत. त्यामुळे स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रत्येक जयंतीला त्यांच्या फेसबुक अधिकृत पेजवरून अभिवादन करत आले आहेत. वाचनाची प्रचंड आवड असल्याने राज यांनी स्वतः स्वातंत्रवीर सावरकरांची पुस्तकं वाचली आहेत आणि त्यामुळे त्यावर देखील आज विचार मांडतील अशी शक्यता आहे असं आजच्या व्यासपीठावरील फोटोवरून दिसत आहे.
#Savarkar
हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ, क्रांतिवीरांचे सेनापती, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी विचार मांडणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. pic.twitter.com/wju09WMQk1— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2018
क्रांतिवीरांचे सेनापती, हिंदू संघटक, समाजसुधारक, साहित्यिक, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी ठोस विचारमांडणी करणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.#VeerSavarkar pic.twitter.com/innCdcawwK
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2019
Web Title: MNS Party Maha Adhiveshan Raj Thackeray may talk on Veer Savarkar today.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं