कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी मोर्चे काढले गेले: राज ठाकरे

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.
पुढे राज ठाकरे म्हणाले की, सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो. देशात अनेक बाॅम्ब ब्लास्ट झाले त्यामागे दाऊद इब्राहीम, त्याला पाकिस्ताननं सांभाळलं. ज्यावेळी केंद्राचे चुकीचे निर्णय झाले त्यावेळी टीका केली,जेव्हा चांगली गोष्ट झाली तेव्हा अभिनंदनही केलं. आज पाकिस्तान टेररीस्टचा अड्डा, लादेनही पाकिस्तानमधे सापडला. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल. इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका. हा देश साफ करावा लागेल. केंद्राला कारवाई करावी लागेल अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर यांनी कडक इशारा दिला आहे.
“काही हिंदू आहेत, किंवा इतर आपल्या राज्यातील आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते येथीलच आहे. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना ४८ तास द्या, ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
२०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे. अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.
Web Title: MNS Mumbai Maha Morcha against illegal immigrants in India.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं