आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणूक मनसे लढणार का? लढणार तर किती जागांवर आणि कोणासोबत आघाडी करून, अशा प्रश्नांची उत्तरे सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधान सभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे शांत बसणार नाहीत असे सांगत भाजपचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी थेट राज ठाकरेंनाच छेडले आहे.
मनसेचा मुंबईत कार्यकर्ता मेळावा रविवारी आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती ’ईडी’च्या चौकशी नंतर राज ठाकरे म्हणाले होते की, गप्प बसणार नाही. मात्र त्यांनतर ते अजून तरी ते शांत आहेत, असा प्रश्न विचारला असता शेलार म्हणाले की, राज यांचा व्यक्तिगत स्वभाव जो मला माहित आहे, त्यानुसार ते गप्प बसणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास १०० ते १२५ उमेदवार उभे करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायकरित्या कळते. मागील दोन ते तीन दिवसांत मनसे उमेदवारांची यादी जाहीर करणार असून ५ ऑक्टोबरला मनसे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचेही कळते. राज यांच्या उपस्थितीत मनसेचा आज मुंबईत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं