मनसे ग्रामीण महाराष्ट्रात मोफत 'शेतीचा दवाखाना' म्हणजे माती परीक्षण केंद्र सुरु करणार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण महाराष्ट्र म्हटलं की सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी आणि तोच मनसेच्या केंद्रस्थानी असेल अशी शक्यता असून. त्याअनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे महाराष्ट्र सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोफत माती परीक्षण करून शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी आणि आपल्या शेतात कोणते पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते याची माहिती होण्यासाठी मनसेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लवकरच मोफत माती परीक्षण केंद्र म्हणजे ‘शेतीचा दवाखाना’ सुरू करण्यात येणार असल्याचे प्राथमिक वृत्त आहे आणि त्यासंबंधित सविस्तर माहिती लवकरच प्राप्त होईल.
राज्यात अनेक शेतकरी जमिनीचे परिक्षण न करता विविध प्रकाराची खते आणि किटकनाशकांची फवारणी करतात. यातून जमिनीचा पोत बिघडतो. उत्पन्नात कमालीची घट होते. यावर प्रभावी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात अतिशय कमी शुल्कात ही सेवा उपलब्ध केली असून शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास शेतीची दूरवस्था दूर करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी सरकारी यंत्रणा अपूरी पडत आहे.
शेतकऱ्यांमध्ये आता जागृती वाढत असली तरी आजही म्हणावे तसे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पनांचा स्वीकार करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी मनसेचा देखील हातभार लागू शकतो. त्याचाच भाग म्हणून माती परिक्षणाविषयी जागृती केली जाणार आहे. शेतीचे एकूण क्षेत्र लक्षात घेवून सावलीखालील अथवा शेताच्या काठावरची जमीन माती तपासणीसाठी योग्य ठरणार नाही. तसेच शेतात शेवाळ असल्यास त्या भागातली माती तपासणीसाठी घेऊ नये. सतत ओलावा नसेल, अशा जागेवरील माती परिक्षणासाठी योग्य नमूना ठरु शकतो. निष्कर्ष योग्य निघतात.
ओलसर जमिनीचे नमुने टाळावे:
मातीचा नमुना घेण्यासाठी विविध अवजारांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमूना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वीच घ्यावा. पिकास रासायनिक खत दिले असल्यास ३ महिन्यांच्या आत सदर जमिनीतून मातीचा नमूना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारची जमीन किंवा शेतातील मातीचे नमूने एकत्र मिसळू नयेत. माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापरू नये. शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाड, विहिर पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमूने घेऊ नयेत.
नमूना घेण्याची पद्धत:
नमूना काढण्यासाठी प्रथम शेतीची पाहणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. त्यानंतर जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच व सखलपणा, पाणथळ किंवा ओलसर जागा आदी बाबींचा विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमूना घ्यावा. एका हेक्टरमधून १५ ते २० ठिकाणची माती घ्यावी. नमूना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी २५ सें.मी., तर फळपिकांसाठी ६० सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
पिकांना लागणारी अन्नद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाहीत, त्यांचे प्रमाण किती आहे, जमीन पीक लागवडीस योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याचे परीक्षण करतात. याद्वारे मातीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश तसेच विद्राव्य सार, सामू (पीएच्) यांचे तपासतात. सामू आणि विद्राव्य क्षार या घटकांवरून जमीन आम्ल अथवा विम्ल आहे, ती किती क्षारीय (क्षारपड) आहे ते कळते. यावरून जमिनीत पिकासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय योजता येतात. माती परीक्षणाचा हाच प्रमुख उद्देश आहे.
पिके त्यांना लागणारी पोषणद्रव्ये जमिनीतून शोषण करीत असतात. जमिनीत या अन्नद्रव्यांचा उपलब्ध साठा फारच कमी असतो. सतत पिके घेत गेल्याने कालांतराने जमिनीतून पिकांना होणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊ लागते. त्यामुळे नंतरच्या पिकांची वाढ नीट होत नाही. उत्पादनात घट होते. म्हणून, रासायनिक खतातून ही द्रव्ये पिकांना पुरविणे भाग पडते. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीपकी रासायनिक खत हे महागडे साधन आहे. म्हणून, पिकांना हे खत देताना गरजेपुरतेच वापरले, तर शेतीखर्चावरील ताण कमी होऊ शकतो. माती परीक्षणाच्या अहवालावरून पिकासाठी नत्र, स्फुरद व पालाश खतांच्या मात्रेसंबंधी शिफारस करता येते. त्यामुळे पिकांना खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी देता येतात. याचा फायदा म्हणजे, खतावर होणाऱ्या खर्चात बचत होते आणि उत्पादन अधिक फायदेशीर होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं