मुख्यमंत्री साहेब वीज बिलाचं काय झालं | सरकार इतके निर्दयी कसे काय झाले - मनसे

मुंबई, ०१ जानेवारी : कोरोना काळात लॉकडाउनमुले राज्यातील तिजोरीत खडखडाट असल्याचं राज्य सरकारने अनेकदा मान्य केलं होतं. त्यात अनेक महिने घरी बसलेल्या सामान्य लोकांच्या उद्योग आणि नोकऱ्यांवर परिणाम झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील खालावली आहे. त्यातच वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून भरमसाट बिलं पाठवल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
परिणामी राज्य सरकारवर वीजबिलात सूट देण्याची मागणी पुढे करण्यात आली होती. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर राज्य सरकारविरोधात आंदोलन देखील पुकारलं होतं. राज्यातील अनेक भागात जिल्हा पातळीवर निवेदनं देण्यात आली. त्यानंतर थेट अर्थमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटून वीजबिलात सूट देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी सूट देण्यात येईल असं राज्यसरकारने देखील सांगितलं होतं.
मात्र प्रत्यक्षात ठाकरे सरकारने यासंदर्भातील कोणतीही सूट अथवा माफी दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी पोश्टरबाजी करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच प्रश्न केला आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आले …गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले…..मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले… #मुख्यमंत्रीवीजबिलाचंकायझालं
मा.महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आले …
गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले.जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा @NitinRaut_INC उर्जा मंत्री म्हणाले..@CMOMaharashtra साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले…?#मुख्यमंत्रीवीजबिलाचंकायझालं ? @mnsadhikrut pic.twitter.com/XN0cURJvzl
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 1, 2021
News English Summary: In fact, the Thackeray government has not given any waiver or amnesty in this regard. Therefore, the enraged Maharashtra soldiers are posting posters and directly questioning Chief Minister Uddhav Thackeray. It says, ‘Mr. Chief Minister, the new year has come with sweet words. Even if there is no money in the pockets of the people, pay the electricity bill, said Energy Minister Nitin Raut. How did the Chief Minister become so ruthless?
News English Title: MNS Poster against CM Uddhav Thackeray regarding high electricity bills news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं