अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळताच संधीसाधू रिक्षावाले मस्त!

मुंबई : अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळतच मुंबई शहरातील रिक्षावाल्यांनी नेहमीप्रमाणे संधी साधली आहे. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने चाकरमान्यांनी कसे ही करून ऑफिस गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र होते. प्रति प्रवाशामागे ऑटो रिक्षाने अंधेरी ते वांद्रा हे अंतर केवळ १५० रुपयात सहज गाठता येत, पण प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली.
दुसरा पर्याय नसल्याने ऑफिसला लवकर पोहचण्याच्या आशेने प्रवाशांनी सुद्धा वाट्टेल ती किंमत मोजली आहे. ज्या शहरांवर आणि प्रवाशांवर रिक्षावाल्यांच घर चालत तोच मुंबईकर जेव्हा घराबाहेर पडून प्रवासाला निघतो तेव्हा प्रवासादरम्यान एखाद संकट याच प्रवाशांवर येतात तेव्हा हेच रिक्षाचालक त्याला संधी समजून अधिक पैसे उकळतात हा दरवेळचा अनिभव आहे.
त्यामुळे शहरात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रामाणिक रिक्षाचालक उरले असावेत. परंतु शहरावर आलेल्या संकटाला संधीत रूपांतरित करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या प्रचंड मोठी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं