चौकीदारांनी मनसेच्या कामाचं श्रेय चोरलं, मनसेने २०१६ पासून केला होता पाठपुरावा

मुंबई : मुंबईमध्ये सामन्यांसाठी आंदोलन करणं का मुळात भाजपचा पिंडच नाही. त्यामुळे इतर पक्षांनी केलेल्या आंदोलनाचे श्रेय लाटण्याशिवाय भाजपच्या चौकीदारांकडे पर्याय नसल्याचं दिसत आहे. त्यातीलच एक आंदोलन म्हणजे कोकणाचा चाकरमानी मोठ्या संख्येने कांजूर, भांडुप आणि विक्रोळी पट्यात राहतो आणि त्या अनुषंगाने कोकणात जाण्यासाठी प्रवासाच्या अनुषंगाने सोयीस्कर पडावं म्हणून कोकण रेल्वे भांडुप स्टेशनला सुद्धा थांबावी यासाठी मनसेने आधीचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे २०१६ पासून लेखी पाठपुरावा केला होता.
दरम्यान, तत्पूर्वी मनसेने कांजूर, भांडुप आणि विक्रोळी पट्यात मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहीम राबवली होती. परिणामी रेल्वेप्रशासन आणि कोकण रेल्वेवर अधिक दबाव वाढला होता. मनसेचे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांनी त्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी संदीप जळगावकर, विनोद शिंदे आणि उदय सावंत यांनी देखील या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आंदोलन, स्वाक्षरी मोहीम आणि लोकशाही मार्गाने रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे प्रशासनासोबत केलेल्या संघर्षांतून जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपचे आयतोबा जागे झाले आणि स्थानिक विभागांमध्ये कामाचे आयते श्रेय लाटण्यासाठी होर्डिंगबाजी सुरु केली आहे.
त्यात हास्यस्पद होर्डिंगबाजी म्हणजे यावर श्रेय देताना ते विद्यमान आणि नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांचं नाव देण्यात आलं आहे. कारण देशाचे नवे रेल्वेमंत्री कोण होणार हे लोकांना समजून अजून २ दिवस देखील झालेले नाही. तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांना खासदार बनून अजून आठवडा देखील झाला नाही, त्यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातले विषय समजल्याचा कांगावा केला जात आहे. हास्यापद यासाठी देखील म्हणावं लागेल कारण, कोकण रेल्वे कोठे थांबणार हा निर्णय खासदार घेत नसतात तर रेल्वे प्रशासन किंवा रेल्वे मंत्रालय घेतं. मात्र भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्याला खासदार मनोज कोटक यांचा निर्णय असं म्हणत होर्डिंगबाजी केली आहे. त्यामुळे भाजपची आयती उचलेगिरी पुन्हा समोर आल्याचं मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं