महापौरांची गाडी 'नो पार्किंग'मध्ये पार्क; अन पालिकेची सामांन्यांकडून १० हजार वसुली

मुंबई: मुंबईमध्ये नो पार्किंगच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दंड आकारले जात असून सामान्य वाहन मालकांमध्ये पालिकेविषयी संतप्त भावना आहेत. मात्र मुंबई शहराचे प्रथम नागरिक स्वतः पार्किंगचे नियम पायदळी तुडवत आहेत असंच म्हणावं लागेल. मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या महापौरांवर कोणताही दंड आकारण्यात आला नसून, नियम केवळ सामान्यांसाठी आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, सामान्य लोकांनी नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास तब्बल १० हजारांमध्ये दंड आकारले जात आहेत, जो सामान्यांना परवडणार देखील नाही.
मात्र सत्ताधाऱ्यांना नियम लागू होत नसावेत असंच सध्या म्हणावं लागेल. कारण शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनीच नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी ‘नो पार्किंग’ बोर्डच्या अगदी समोर उभी असल्याचं दिसून येत आहे. महापौर विलेपार्ल्यात गेले असताना हा प्रकार घडला. त्यामुळे सर्वसामान्यांना लागू असणारे नियम उच्चपदस्थांना लागू होत नाहीत का, असा प्रश्न सामान्यांनी उपस्थित करत शिवसेनेवर संताप व्यक्त केला आहे.
प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी महाडेश्वर विलेपार्ल्यात होते. त्यावेळी त्यांची कार एका हॉटेलसमोरच्या रस्त्यावर उभी होती. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड अगदी स्पष्ट दिसत होता. या भागातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. परंतु तरी देखील महापौरांची कार या भागात उभी होती. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर गेल्या आठवड्याभरापासून पालिकेनं मोठी कारवाई सुरू केली आहे. परंतू असं असताना महापौरांचीच कार ‘नो पार्किंग’मध्ये दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महापौर गेलेल्या भागात वाहनतळ नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. महापौरांची कार नो पार्किंग झोनमध्ये उभी करायला नको होती, असंदेखील अधिकारी म्हणाला. शनिवारी विलेपार्ल्यातील हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, असं महाडेश्वर म्हणाले. ‘मी कारमधून उतरुन हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी चालकानं कार नेमकी कुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती. पण कायद्यासमोर सगळे समान असतात आणि प्रत्येकानं नियम पाळायलायच हवेत, असं मला वाटतं. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मी माझ्या कर्मचारी वर्गाला नियमांचं पालन करण्याच्या सूचना करणार आहे,’ असं महाडेश्वर यांनी सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं