मुंबई: हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका

मुंबई: मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये चालविले जाणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आले आहे. तसेच तीन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
या तिघी टीव्ही मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी एका महिला दलालास अटक केली. बेकायदा देहव्यापाराविरोधात मुंबई पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या नवी दिल्लीतील आवेश, विनय आणि कुलदीप जेनी या तिघांच्या मुंबईतील महिला दलाल प्रिया शर्मा हि संपर्कात असून ती देहव्यापारासाठी तरुणी पुरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी महिला कांदिवली पूर्वेला टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी चालवत होती. अनेक बेकायदेशीर गोष्टींमध्ये तिचा सहभाग होता,” असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
सुटका करण्यात आलेल्यांपैकी एक महिला अभिनेत्री आणि गायक असून टीव्ही क्राइम शो ‘सावधान इंडिया’मध्ये काम केलं आहे. तर दुसऱ्या महिलेने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. अल्पवयीन मुलीने बेव सीरिजमध्ये काम केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
Web Title: Mumbai police trapped high profile sex racket in Andheri.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं