महाराष्ट्रनामा इफेक्ट: मुंबईतील शहाजी राजे भोसले संकुलातील स्विमिंग पुल अखेर सभासदांसाठी खुला

मुंबई : मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आला होता. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं महाराष्ट्रनामा टीमने उजेडात आणलं होतं. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची आमच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेतली होती. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसल्याने, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली होती.
सदर जलतरण तलावाची जवाबदारी मुंबई महानगरपालिकेने ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाणला’ तब्बल ३० वर्षांसाठी बहाल केल्याचे चौकशी अंती समजले. विशेष म्हणजे त्यातील २९ वर्ष पूर्ण होत आल्याचं उजेडात आलं होतं. दरम्यान सदर जलतरण पुलाच्या दुरुस्तीचे काम जुलै २०१९ पर्यंत पूर्ण होणार होते. मात्र सभासदांना लेखी हमी देऊन देखील हा जलतरण तलाव सभासदांसाठी खुला न झाल्याने आणि त्यापूर्वी देखील तो अनेक वेळा बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याने अखेर शंकर येराम यांनी विषयात खोलवर जात थेट मुख्यमंत्री, महापौर, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते, आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, संबंधित खात्याचे उपायुक्त तसेच ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’चे कॉम्प्लेक्स अधिकारी विनायक गोडांबे आणि प्रमुख लेखापाल रमाकांत सावंत यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला होता.
सदर विषयाच्या प्रशांवरून मुंबई महानगरपालिका आणि ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’चे संबंधित अधिकारी देखील माहिती लपवत असल्याचं निदर्शनास आलं होतं. दरम्यान, संतापलेले सभासद आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याने महत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीला सांगितलं होतं. महाराष्ट्रनामाच्या टीमने देखील हा विषय उचलून धरला होता आणि अखेर पालिकेला जाग आली असून संबंधित स्वामिंग पुल सर्व सभासदांसाठी खुला करण्यात आला आहे. सभासदांनी त्याचा कालपासून वापर करण्यास सुरुवात केल्याचा व्हिडिओ खाली देण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं