आज रिपोर्ट आला, शिवसेना भवनातील अजून ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई, २८ जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आता थेट शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
रविवारी कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या तिघांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. शिवसेना भवनचा एक कर्मचारी गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित झाला होता. शिवसेना कार्यालय ३ दिवसांकरता बंद करण्यात येत आहे. संपूर्ण कार्यालय सेनिटाइज करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण असल्याचं समजतं.
News English Summary: It has been revealed that the corona was infiltrated in the Shiv Sena building at Dadar, which is the headquarters of Shiv Sena. Three people in Sena Bhawan have contracted corona and are undergoing treatment.
News English Title: Mumbai Shivsena Bhavan closed after party worker tested covid 19 News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं