नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, इस्पितळातील 'त्या' घटनेवर तक्रारीत संशय

मुंबई, २१ जुलै : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नसल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणारे शिवसेनेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नांदगावकर यांनी याबाबत नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अलीकडंच हिरानंदानी रुग्णालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ते चर्चेत आले आहेत. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात एका करोनाग्रस्त रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. त्या रिक्षाचालकाच्या उपचाराचं बिल आठ लाख रुपये झालं होतं. ते भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याची भूमिका रुग्णालय प्रशासनानं घेतली होती. हे कळताच नांदगावकर यांनी तिथं जाऊन राडा केला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकांशी त्यांची शाब्दिक वादावादी झाली होती. सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावर धावूनही आले होते. त्याचा राग मनात धरूनच ही धमकी आली असावी, असं नांदगावकर यांनी पोलीस तक्रारीत नमूद केलं आहे.
नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल.#Shivsena #NitinNandgaonkar pic.twitter.com/mE67XHCCnA
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) July 21, 2020
त्यानंतर मी सदर रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यावेळी माझी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की झाली होती. दरम्यान सोमवारी सकाळी मला मोबाइलवर धमकी देणारा फोन आला. तसेच मला शिविगाळ करण्यात आली, असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला आहे.
‘यूपी, बिहारवाल्यांना तू काय समजतोस? तुझ्या घरात घुसून तुला तीन दिवसांत मारून टाकू. तुझ्या बायकापोरांना कापून टाकू. तू मला ओळखत नाहीस,’ अशी धमकी संबंधित इसमानं दिली. ज्या मोबाइल नंबरवरून धमकी आली होती, तो मोबाइल नंबर (९९६७१००३३३) देखील नांदगावकर यांनी पोलिसांना दिला आहे. ‘सामाजिक कामानिमित्त मी बराच वेळ घराबाहेर असतो. अशा वेळी माझ्या कुटुंबीयांना काही दगाफटका झाल्यास हा इसम जबाबदार राहील, असंही नांदगावकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
News English Summary: Shiv Sena office bearer Nitin Nandgaonkar and his family have been threatened with death for questioning the administration of Hiranandani Hospital for not handing over the death of a rickshaw puller to his family.
News English Title: Mumbai Shivsena leader Nitin Nandgaonkar receives death threat News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं