स्वाभिमान पक्षाने नाणार प्रकल्प 'समर्थकांची' पत्रकार परिषद उधळली

मुंबई : कोकणच्या आणि नाणारच्या भूमीशी काही संबंध नसलेले सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
नाणार प्रकल्प झाला पाहिजे असे जाहीर समर्थन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांना चांगलाच दणका मिळाला. मुंबईतील मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत त्यांना उपस्थित पत्रकारांनी आपण कुठल्या गावचे आहात ? आपली जमीन या प्रकल्पात जाणार आहे काय ? असे प्रश्न उपस्थित केले. परंतु त्याला एकही समाधानकारक उत्तर आयोजका कडून मिळालं नाही.
परंतु नाणारच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या ह्या लोकांचा काहीच संबंध नसून, हे सर्व बाहेरचे लोक आहेत असा आरोप करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तेथे झेंडे घेऊन थेट आत शिरले. परंतु काही जणांनी थेट पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून तक्रार केली. परंतु त्याआधीच सर्व प्रकार आटोपला आणि नंतर सेंगर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना झाल्या प्रकारचा निषेध नोंदवला.
सेंगर म्हणाले की, प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी हा मंच स्थापन केला आहे असा थेट आरोप वालम यांनी केला आहे. मुळात सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांचा कोकण आणि नाणार बरोबर नक्की नातं काय हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
नाणार प्रकल्प बचाव समितीची मुंबईतील पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली!!
गर्व आहे आमच्या कार्यकर्त्यांचा!!
जय कोकण ✊????✊???? pic.twitter.com/Aa2eyElA6H— nitesh rane (@NiteshNRane) April 25, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं