पवार साहेब माझ्या हृदयात, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेत: सचिन अहिर

मुंबई : एनसीपी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वत: सचिन अहिर यांनी याबाबतची माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर शिवबंधन बांधणार आहेत. त्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास सचिन अहिर मातोश्रीकडे रवाना झाले होते.
सचिन अहिर म्हणाले, “आदरणीय पवारसाहेबांची साथ मिळाली. ती न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात. ते योग्य आहेत की नाही हे काळ ठरवतो. आदित्यसारख्या तरुणाशी माझी चर्चा झाली. वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम करण्याचं काम त्याच्या मनात आहे. त्याची जिद्द आहे. अशावेळी राज्यभरातील अशा तरुणांना साथ देणं, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळत आहे. त्यामुळे निर्णय घेतला”
आम्हाला पक्ष फोडायचा नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या कामानं मी प्रभावित झाल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्या जागेवरून कोणाला लढवलं पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष श्री. @AhirsachinAhir यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/mhK2PWquVZ
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 25, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं