आपत्तीत सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष टोकाला; शरद पवार राज्यपालांच्या भेटीला

मुंबई, २५ मे : राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार राजभवनावर पोहोचले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल आणि शरद पवारांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. pic.twitter.com/pVRKiKo9oe
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 25, 2020
मागील काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने संघर्ष सुरु आहे. भाजपकडून नुकतेच ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनही करण्यात आले होते. तसेच कालपासून श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्य सरकारच्या नियोजनाअभावी गेल्यावेळी रेल्वेला ६५ ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या, असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला होता. मात्र, राज्य सरकारने आपण रेल्वेला सर्व मजुरांची यादी आणि तपशील दिल्याचा दावा केला आहे. मात्र, पियुष गोयल यांनी हा दावा फेटाळून लावला होता.
यावरुन आता महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याशिवाय, इतर अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष झडताना दिसत आहे. सध्याच्या संकटकाळात ही गोष्ट राज्याला परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आता राज्यपाल पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांच्यापुढे काही प्रस्ताव ठेवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News English Summary: Disputes have erupted between the state government and the governor over government decisions. There is resentment among ministers over the governor’s interference in government work. Against this backdrop, NCP President Sharad Pawar has reached out to Governor Bhagat Singh Koshyari.
News English Title: NCP President Sharad Pawar meet to the governor Bhagat Singh Koshyari News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं