सुशांत प्रकरणी CBI चौकशीला मी विरोध करणार नाही, पवारांच्या विधानाने अनेकांना आश्चर्य

मुंबई, १२ ऑगस्ट : माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना ५० वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेनेचा सीबीआय चौकशीला विरोध असल्याने आणि परस्पर त्याविरोधात पवारांनी भाष्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेष करून विरोधकांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्याबद्दल ट्विट देखील केलं आहे.
CBI चौकशीबाबत @PawarSpeaks
काय बोलले आहेत ते ऐका….
मी पार्थ पवारांना काडीचीही किंमत देत नाही, पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे, पण (सुशांतप्रकरणी) कुणाला CBI चौकशी हवी असेल तर माझा विरोध नाही. ??? pic.twitter.com/6ZUbqfMZa2— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2020
News English Summary: I have full faith in Maharashtra Police and Mumbai Police. However, if the CBI wants to probe the death of Sushant Singh Rajput, I will not oppose it, said NCP president Sharad Pawar.
News English Title: NCP President Sharad Pawar says wont oppose CBI inquiry in Sushant Singh Rajput death case News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं