त्या १०० टक्के नालेसफाईतील 'टक्केवारी' नक्की गेली कुठे? सविस्तर

मुंबई : मुंबई आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस उलटले नाहीत तरी जागोजागी पाण्याची गटारं तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहन देखील अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस झाले आहेत आणि म्हणावा तास पाऊस देखील पडलेला नाही, मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सामना वृत्तपत्रात शिवसेनेकडून १००% नालेसफाईची कामं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पावसाच्या पहिल्याच झटक्यात मुंबईतील नालेसफाईच्या कामातील टक्केवारी नक्की गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या सामनातील ३० मे रोजी देण्यात आलेल्या बातमीनुसार पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरात सुरू असलेले नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत ९० टक्क्कांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी छोटय़ा प्रमाणात शिल्लक असलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून पावसाळ्याआधी १०० टक्के नालेसफाई पूर्ण होईल असा ठाम विश्वास शिवसेना प्रणित महापालिकेने व्यक्त केला आहे.
तसेच मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि महापौरांनी नुकताच घेतला असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये पावसाळय़ात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नालेसफाईवर विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईत २३ मे पर्यंत ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती यावेळी पर्जन्य जलवाहिन्या खात्याकडून देण्यात आली होती. दरम्यान, दरवर्षी १० एप्रिलपासून सुरू होणारी नालेसफाई पालिकेने या वर्षी १० दिवस आधीच म्हणजे १ एप्रिलपासून सुरू केली असल्याचा दावा देखील सामनातून करण्यात आला होता.
त्यात पालिकेकडून नालेसफाई केली जात असली तरी रेल्वे हद्दीतील नाले तुंबल्याने वाहतूक खोळंबल्यास पालिकेवर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर रेल्वे हद्दीतील नालेसफाईवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे असं म्हटलं होतं. यामध्ये व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी करण्यात येत आहे असं म्हटलं होतं. शिवाय रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा घेऊन आवश्यक काम सुचवण्यात आले आहे. हे काम पुन्हा क्रॉस चेक केले जाणार असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
सामनातील नालेसफाईची टक्केवारी अशी प्रसिद्ध करण्यात आली होती.
शहर- ८९
पूर्व उपनगर- ८७
पश्चिम उपनगर- ८१
शहरातील मोठे नाले- ८३
शहरातील छोटे नाले- ६७
पूर्व उपनगरातील मोठे नाले- ९१
पश्चिम उपनगरातील मोठे नाले – ८५
पूर्व उपनगरातील छोटे नाले- ८३
पश्चिम उपनगरातील छोटे नाले- ६१
शहरातील छोटे नाले- ६७
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं