इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही: आदित्य ठाकरे

मुंबई: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“इंदिरा गांधींबद्दल स्वत: शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर होता. त्यांच्याबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही. त्यांचा हेतू साफ होता. यापूर्वी किंवा यानंतरही कोणताही शिवसैनिक इंदिरा गांधींबद्दल बोलणार नाही,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
राऊत यांनी केलेलं विधान हे वेगळ्या संदर्भता होतं, त्यांचे ते निरिक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक विधानं हे त्या संदर्भातणं बघणं गरजेचं आहे. या मुद्द्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता निवडणुका होऊन गेल्या आहेत त्यामुळे राजकीय न बोलता कामाबद्दल बोलावं.
दरम्यान, ठाकरे सरकारनं कुठल्याही कामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त या आधीच्या ज्या प्रकल्पांमध्ये आपण पैसा चांगल्या पद्धतीने वापरु शकतो, त्याबाबत रिव्ह्यू केला जात आहे. आज झालेल्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना हेच सांगण्यात आल आहे की, जनतेचा पैसा चांगल्या कामांसाठी वापरला जाईल याची काळजी घ्या असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Web Title: No Shivsena member will be abusive about former Prime Minister Indira Gandhi says Minister Aaditya Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं