आदित्य ठाकरेंकडून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर अखेर आज आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांच्या समोर प्रकट झाले आणि उणिवा स्वीकारण्यापेक्षा त्यांनी पालिकेच्या कामचुकार कारभाराची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. मागील २ दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची पाठराखण केली आहे.
‘मुंबईतील पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. महापालिकेची यंत्रणा नाही जर जगातील कोणतीही यंत्रणा अशा पावसासमोर हतबल होईल हे सत्य आहे. गेल्यामागील ४ दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. महापालिका यंत्रणा आणि व्यवस्थापन कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती आहे यासाठी पालिकेला दोष देऊन चालणार नाही‘, अस म्हणत आदित्य ठाकरे यांनी महापाकीलेच्या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी ‘मुंबईत बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरु आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये आणि खोदकाम केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे असे विधान केले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना नेत्यांची सध्याची विधानं ही कीव करावी अशीच आहेत, असा अनुभव सध्या प्रसार माध्यमांना देखील येतो आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं