महत्वाच्या बातम्या
-
सुशांत प्रकरण | मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी लाखो फेक अकाउंट | BOTS चा वापर
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक वास्तव समोर येताना दिसत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि जगात स्कॉटलंड यार्डशी पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीला समाज माध्यमांवर संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. समाज माध्यमांनी एकप्रकारे मुंबई पोलिसांनाच तपासावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग करण्यात आला होता. परंतु , सदर प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यासाठी समाज माध्यमांवर फेक अकाऊंट ओपन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कोकणातील ११ आमदार घरी बसवणार | राणेंची गर्जना
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांना पराभूत करणार. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना पूर्णपणे हद्दपार करणार अशी राजकीय गर्जना भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फिल्मी लक्ष्मीबाईंवर जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा खटला | मुंबई पोलीसांचंही समन्स
बॉलीवूड कलाकार कंगना रणौतच्या विरोधात काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील प्रोडक्शन हाऊसेसने खटले दाखल केले आहेत. त्यानंतर तिच्या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. तत्पूर्वी म्हणजे मागील महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या आधीच आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या त्या जमिनीवर विकास काम होत आहे | कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही
मुंबईतील मेट्रो ३ कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरुन आता मोदी सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये वाद उफाळून आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र केलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावरून केंद्र सरकारला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
समीत ठक्कर कोर्टापुढे हजर | पुन्हा मुंबई पोलिसांच्या कोठडीत | नेटीझनगिरी भोवली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह टिपणी करणाऱ्या समीत ठक्करला (Sameet Thakkar) न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीत ठक्करला गुजरातच्या राजकोटहून २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्याला आज न्यायालयापुढे पुन्हा हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ कांजूरमार्गच्या जमिनीवर केंद्राचा दावा | मोदी सरकार व गुजरात केडरचे अधिकारी सरसावले
ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करून कागदोपत्री आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्य सरकारचा सर्वबाजूंनी कौतुक करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर राज्यातील भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने आडकाठी घातल्याने खळबळ माजली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांच्या एवढं ओबीसींसाठी कोणीही काम केलं नाही | दरेकरांचा दावा
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल करताना अनेक आरोप देखील केले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणून उत्तर महाराष्ट्रात भाजपला हादरे देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मी ओबीसी नेता असल्यानेच माझ्यावर अन्याय करण्यात आला असा आरोपही यापूर्वी खडसेंनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | कृत्रिमरित्या TRP वाढविण्यासाठी करोडो वाटले | हवालाचा वापर
मुंबई पोलिसांकडून TRP Scam ची चौकशी मोठ्या वेगाने पुढे सरकत आहेत. ज्या वेगाने चौकशी पुढे सरकत आहे त्याच वेगाने धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. आता TRP घोटाळ्यात प्रचंड प्रमाणात पैशाची अफरातफर तसेच देवाणघेवाण झाल्याची धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली. विशेष म्हणजे त्यासाठी चक्क हवालाचा वापर झाल्याने मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती संबंधित आरोपींच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपाल राज भेट सामान्यांना फलदायी | वीज बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडून दिवाळीपूर्वीच
महाराष्ट्र वाढीव वीज बिलांवरून सामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सामान्य लोकांमध्ये सरकार आणि वीज पुरवठा कंपन्यांविरोधात रोष पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची देखील भेट घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात दिवाळी आली | चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
राज्यात अजून लॉकडाउन ५ संबंधित निर्णय निर्णय राज्य सरकारकडून प्रलंबित आहेत. त्यात राज्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू दरात घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी हिवाळ्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे स्थिती चांगली नाही आणि त्यात एकामागे एक सण-उत्सव येत असल्याने सामान्य लोकांचा देखील हिरमोड होतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अकरावी प्रवेश | राज ठाकरेंची शिक्षण मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा | उद्या निर्णय अपेक्षित
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग निघत नसल्याने कोचिंग क्लासच्या शिष्टमंडळाने आणि पालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन सदर विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या निर्णयांमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आणि नेमकी कॉलेजेस केव्हा सुरु होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न निर्नाम झाल्याने अनेकांची भविष्य टांगणीला लागली आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची अॅडमिशन झाली आहेत, यावर राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | मुख्यमंत्री आज यादी राज्यपालांना सोपविणार | पण खडसेंबाबत...?
विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक लोकल प्रश्नावर कोमात | आ. रोहित पवारांचं टीकास्त्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेतून ( Western Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून आली आहे. मुंबईत 1 नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)यांनी काल रात्री उशीरा दिली आहे. याशिवाय, वातानुकूलित आणि लेडीज स्पेशल गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मिळून दिवसाला लोकलच्या १४१० फेऱ्या होतात. मात्र, आता ही संख्या २०२० इतकी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडून काही होताना दिसत नाही हे राज ठाकरेंनी देखील सांगितलं आहे | प्रवीण दरेकर
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला होता.
5 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | उर्मिलाने काँग्रेसची ऑफर नाकारली पण शिवसेनेची ऑफर स्वीकारली
राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत | मनसेकडून फोटोमार्गे राऊतांची चिरफाड
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगणाला जास्त महत्व देण्याच्या गरज नाही | ती पोलिसांसमोर येण्यास घाबरतेय
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ते असे म्हणाले की, बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात असल्याचं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या; पण सरकार पूर्ण ताकतीने चालतंय आणि चालेल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस दल जगातील एक चागंल पोलीस दल | न्यायालयाने पाठ थोपटली
कोरोना, लॉकडाऊनच्या काळात पोलीस त्यांचे कर्तव्य अत्यंत दबावाखाली पार पाडत आहेत. विपरीत परिस्थितीतही चाेख कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना नागरिकांनीही सहकार्य करावे. मुंबई पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एक असल्याचे मानण्यात येते, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले. या काळात पोलिसांचे काम कठीण होते. पोलीस दबावाखाली होते. त्यानंतर मिरवणूक, मोर्चे इत्यादींसाठी बंदोबस्त करण्याचे कामही होते, असे निरीक्षण न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने नोंदविले.
5 वर्षांपूर्वी -
विमानतळं अदानी-अंबानींना विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी इथे...
आर्थिक तोट्यामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation)आपली मालमत्ता तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांचे पगार आणि स्वेच्छा निवृत्तीसाठी लागणारे पैसे देण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना बहुतेक मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची अडचण वाटत असावी | सेनेनं डिवचलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी