महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंनी रो-रो बोटीवर मास्क नसल्याने दंड भरल्याचं वृत्त चुकीचं | मनसेकडून खुलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र, ही बाब बहुधा राज ठाकरे यांच्या लक्षात आली नाही. परिणामी राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना नियमाविषयी सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनीच्या पहाटेच्या शपथविधि आडून निलेश राणें यांचं शिवसेनेवर टीकास्त्र
राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते, असा दावा शिवसेनेने केला आहे. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भिंवडीत तीन मजली इमारत कोसळली | दहा जणांचा मृत्यू
भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA चं लोकसभेत समर्थन राज्यसभेत यू-टर्न | कृषी विधेयकाला लोकसभेत पाठिंबा राज्यसभेत सभात्याग
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषिविषयक तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत पारित करून घेतली आहे. काल संध्याकाळी राज्यसभेत प्रचंड गोंधळामध्येही ही विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने पारीत करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोध केला होता. दरम्यान, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोकरदार मुंबईकरांच्या प्रवासाच्या व्यथा समजून घ्या | मनसेचं रेल्वे प्रवास आंदोलन
सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारत लोकल ट्रेनने प्रवास केला. मनसेकडून यापूर्वीच सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरीही संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केला. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांना ८ तास ड्युटी | ८ तास प्रवास | मुंबईकरांसाठी उद्या मनसेचं लोकल प्रवास आंदोलन
मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं | अनुराग कश्यपकडून पाठराखण
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील त्यावर आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे | IPS अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न - गृहमंत्री
राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ‘लोकमत’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता, असे देशमुख यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच | BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
अभिनेत्री कंगना रानौत हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतित्रापत्र मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेने दाखल केले आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | अमिताभ बच्चन यांची दाऊद सोबत मैत्री | अशोक चव्हाण यांचा फोटो वापरून खोटी माहिती
बॉलीवूड अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्वांच्या सहभागाने पायाभरणी समारंभ होणार | राजकारण करू नये - मुख्यमंत्री
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु अनेकांच्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. पण आता यावरुन राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कांदा निर्यात बंदीने राज्य भाजपचीही कोंडी | पवारांसोबत दानवे पंतप्रधानांची भेट घेणार
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी याचा विरोध केला आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्यानं महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह भाजपातील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता, केंद्रीयमंत्री आणि भाजापा नेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे. या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं दानवेंनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली. मागील विधानसभेत राज ठाकरे यांनी कौटुंबिक संबंध जपताना आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. दुसऱ्या बाजूला भाजपाशी युती असल्याने अमराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळाली होती. त्यात राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत आणून त्यांच्या विरुद्धची राजकीय स्पर्धा संपुष्टात आणली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार आक्रमक | विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी अर्णब गोस्वामीला ६० पाणी पत्रं
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
Alert | मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागूच राहणार | पुण्यात?
मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने जमावबंदीचा आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत पण निवडून येणार नाही | माध्यमं जास्तंच महत्व देत आहेत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटतच गेला.
5 वर्षांपूर्वी -
दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पुढील आठवड्यात सुशांतची व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत.
5 वर्षांपूर्वी -
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरण | सर्व आरोपींना जामीन मंंजुर
मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. मात्र त्यानंंतर लगेचच बोरिवली कोर्टातुन या सहाही आरोपींंना प्रत्येकी 15 हजार रुपयांंवर जामीन मंंजुर करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी