महत्वाच्या बातम्या
-
राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा | माजी नौदल अधिकाऱ्याची मागणी
शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले होते. राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात - आ. नितेश राणे
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर भाजपचे आमदार नितेश राणे आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय | हाच माझा गुन्हा
अभिनेत्री कंगना रणौत मुंबईवरून चंदिगडला गेली आहे. मात्र त्यानंतरही तिच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने पुन्हा आरोप केले आहेत. सुशांतच्या हत्येला जबाबदार असणारे आणि बॉलिवूडमधले माफिया, ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांचे कारनामे मी उघड केले, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्याच बरोबर या सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक आहे. हे सगळं उघड करणं हाच माझा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे काढत नाहीत | बॉलिवूडशी संबंध असणारे वांद्रे पूर्वेला राहतात
“बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. एवढंच नाही तर गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत असल्याचाही आरोप त्यांनी केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जातं आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी पत्रक जाहीर करुन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही भाजपा नेते मात्र त्यांच्यावर आरोप करणं सोडत नाहीत असंच दिसून येतं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरं नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान | शिवसेनेचं टीकास्त्र
महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.
5 वर्षांपूर्वी -
शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनाने मृत्यू | आरोग्य विम्यातही सरकारकडून भेदभाव - राज ठाकरे
राज्यातील करोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही करोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. या भेदभावावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिम्सवरून खिल्ली | कंगनावर विरोधी पक्षनेतेपदाची जवाबदारी सोपवून फडणवीस बिहारला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बिहारसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फडणवीस यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमच दिली दिली आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतुन भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच झालं.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान | पण ते यशस्वी होणार नाहीत
भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यातील वातावरण कंगना रानौतच्या विवादित मुद्यावरून ढवळून निघालं आहे. प्रसार माध्यमांवर देखील कंगना प्रत्येक मिनिटाला ट्विट करून महाराष्ट्रात वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विरोधक म्हणजे भाजप केवळ बिहार निवडणुकीसाठी सुशांत आणि कंगनाचा मुद्दा उचलून महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाची बाजू घेतली | त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली - आ. प्रताप सरनाईक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग चौकशीत अडकण्याआधीच कंगनाने मुंबईतून पळ काढला? जातानाही PoK म्हणून पळाली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माफिया म्हटलं त्यांच्या संरक्षणात कंगनाची ट्विटवर टिवटिव | कोरोना ते कंगणा फक्त कर्तव्य
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी बॉलिवूडच्या घराणेशाहीवर कंगनानं प्रश्न उपस्थित केले होते. तसंच, बी-टाऊनमधील अनेक बड्या कलाकारांवरही कंगनानं आरोप केले होते. आता तर तिनं थेट मुंबई पोलिसांवर टीका करत नवीन वादाला तोंड फोडलं होतं. भाजप नेते राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असं म्हटलं होतं. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको,’ असं ट्विट तिनं केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
वैयक्तिक मालमत्तेवर कारवाई केल्याने राज्यपालांची भेट | देशाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण
अभिनेत्री कंगना रानौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला महापालिकेकडून दुसरा झटका मिळणार | खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. दुसरीकडे कंगनाची कार्यलयानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाची खार वेस्ट स्थित फ्लॅटवरून तिला नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत कुठेही कमी पडणार नाही - मुख्यमंत्री
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई असो कि महाराष्ट्र | ब्रँड एकच | छत्रपती शिवाजी महाराज - आ. नितेश राणे
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
राज्य जनतेने मोठं केलं आहे | कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही | निलेश राणेंचा राऊतांना टोला
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड सांभाळण्यास राज ठाकरे समर्थ | संदीप देशपांडेची वयक्तिक प्रतिक्रिया
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे सुद्धा ठाकरे ब्रँडचे घटक | फटका त्यांनाही बसणार | अन्यथा ठाकरे ब्रँडचे पतन
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
5 वर्षांपूर्वी -
केजे एनसीबी'च्या ताब्यात | रियासहित बॉलीवूडमधील मोठे मासे अडचणीत येणार
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती लागले असून त्याआधारे आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक बडा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वडिलांना मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा | त्या अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणानंतर अधिकाऱ्याच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली आहे.
5 वर्षांपूर्वी