महत्वाच्या बातम्या
-
एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास - आ आशिष शेलार
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही | पण त्यांच्या इन्स्टापोस्टवर ती लाईक करते
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी रिया चक्रवर्तीने खुलासा केला होता.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग पब ऍण्ड पार्टी संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या नाईटलाईफ गँगमुळे सुशांतचा बळी - आ. आशिष शेलार
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप के. के. सिंह यांनी याआधी केला आहे. त्यांनी पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवला. रिया आणि तिच्या कुटुंबीयांमुळेच सुशांतनं आत्महत्या केली. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असे आरोप सिंह यांनी केले होते. मात्र आता त्यांनी थेट रियानं सुशांतवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. रिया बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती माझ्या मुलाची मारेकरी आहे, असा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दुर्घटना | मुंबई नागपाड्यातील मिश्रा इमारतीचा काही भाग एकच्या सुमारास कोसळला
मुंबईतील मालाडमधील व महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात आणखी एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली
कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावर असणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली मुंबईत करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य | मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातात, एकच व्यक्ती देश चालवणार अशी परिस्थिती - उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर आज सुनावणी | आरक्षण पूर्ण खंडपीठाकडे जाणार की नाही?
मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबतच्या अर्जांवर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा अर्ज राज्य सरकारने जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात केला आहे. तसंच हीच मागणी करणारा अर्ज या प्रकरणातील इतर 9 हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनीही केला आहे. राज्य सरकारच्या आणि इतर 9 याचिकाकर्त्यांच्या या अर्जांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत
महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन कधी होणार याचा निर्णय शेवटी झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना एकत्र बोलवून सत्र घ्यायचं की नाही, यावर चर्चा सुरू होती. पण शेवटी आता फक्त दोन दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायचा निर्णय झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनबद्दल लोकांचा कौल राज ठाकरेंच्या बाजूने | ऑनलाइन सर्वेक्षणाचा रिझल्ट
‘लॉकडाऊन हवं की नको?’ याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी साडे पाच महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबत जनतेची काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी मनसेनं सहा दिवसांचे सर्वेक्षण सुरु केलं होतं. आज मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या सर्वेक्षणाचा कौल जाहीर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंदी नंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर | ट्विटमध्येच दिला पुरावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात टिकटॉक, कॅम स्कॅनर, यूसी ब्राऊजर, शेअरइट, हॅलो यांसारख्या 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू | विजय वडेट्टीवार
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील मंदिरं उघडा | शिवसेनेची सामनातून मागणी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने अनेक उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातचं देशातील मंदिरांवर असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरांचंही एक अर्थकारण असतं. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं सोडवत असतात. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं - अशोक चव्हाण
नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसपक्षांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. २३ काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत आपली भूमिका माडंली असून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं असं मत त्यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अरे कशाचा दाऊद..दाऊद करत बसलास | अजित पवारांची पत्रकाराला खोचक प्रतिक्रिया
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काय आहे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली | जाणून घ्या
यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सामान आणि प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु : गृहमंत्री
देशभरात पसरलेल्या करोनानं सगळं जनजीवन ठप्प झालं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान निर्माण झाल्यानं केंद्र सरकारबरोबरच राज्यानीही लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माल वाहतूक वगळता इतर सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. याचे परिणाम आर्थिक स्वरूपात दिसून आल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यांना राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या मृतदेहाचे घाईत शवविच्छेदन का | डॉक्टरांनी थेट मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलं?
सीबीआयच्या १५ सदस्यांची टीम या प्रकरणावर काम करत असून या टीमचे पाच छोट्या तुकड्या करण्यात आले आहेत. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे काही धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या ५ डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली. या डॉक्टरांच्या चौकशीसाठी सीबीआयने काही महत्त्वाचे प्रश्न तयार केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील अडचणीत | न्यायालयाचे चौकशीचे आदेश
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत आत्महत्या प्रकरण | सीबीआयकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता सीबीआय ची टीम करिनाच्या डीआरडीओ येथे दाखल झाली आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी याची चौकशी डीआरडीओ कलिना येथे सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी