महत्वाच्या बातम्या
-
एनआयएच्या अटकेतील वाझे आणि प्रदीप शर्मा जुने मित्र | प्रदीप शर्माच्या सेनेतील प्रवेशात शिंदेंचा पुढाकार, शिंदे समर्थकांचे अज्ञान?
आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
32 वर्षीय आदित्य ठाकरेंना जनतेचा राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय | शिंदे गटातील सर्व 40 आमदार लक्ष करण्यासाठी एकवटले
Aaditya Thackeray | शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावरूनच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार त्यांच्याविरुद्ध ५० खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, ५० खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, अशी घोषणाबाजी केली जातेय. त्यातूनच बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला.
3 वर्षांपूर्वी -
एकीकडे शेतकरी, मराठा तरुणांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे समर्थकांनी भाईगिरी
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या कृपेमुळे रॉयल 'मर्सिडीज' लाईफ जगणाऱ्या पिता-पुत्राची राजकीय स्वार्थाने आदित्य ठाकरेंवर मर्सिडीज वरून टीका
MP Shrikant Shinde | आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे गटाच्या सरकारचं काय चाललंय?, मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता सुद्धा त्याच प्रयत्नात
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या छतावर चढले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्रीय निवडणूक आयोगही सुनावणी घेऊ शकणार नाही | 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
Maharashtra Political Crisis | शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे | 25 ऑगस्टला घटनापीठासमोर सुनावणी
शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
सरन्यायाधीश रमणा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार | दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी प्रकरणी तारीख पे तारीख
आज (22 ऑगस्ट) ही सुनावणी पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना | फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका | तर उद्धव ठाकरेंना दिलासा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयावरून शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला आहे, तर उद्धव ठाकरेंना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Effect | प्रचंड महागाई, बेरोजगारीमुळे लोकं मोदींच्या नावाने मतं देणार नाहीत, म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर?
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा काळ आता काहीसा मंदावला असेल, पण वक्तृत्वाचा काळ अद्याप शांत झालेला नाही. या भागात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेखही केला. उद्धव म्हणाले की, फडणवीस बाळासाहेबांच्या नावावर मते मागत असल्याने आता मोदी युग संपलेले दिसते.
3 वर्षांपूर्वी -
MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
MSSC Recruitment 2022 | राज्य सुरक्षा महामंडळाला अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि ७००० सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात आला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमएसएससी भरती 2020 साठी 10 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर पाहू शकता.
3 वर्षांपूर्वी -
निधी वाटपावरून शिंदे गट तोंडघशी पडला, मुख्यमंत्री पदाला अर्थ नसल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी दाखवून दिलं | भाजपाला मजबूत निधी
राष्ट्रवादीकडून निधी देण्यात दुजाभाव केला जात आहे. राष्ट्रवादीने स्वत:ला अधिक निधी घेतला. त्यानंतर काँग्रेसला सर्वाधिक निधी दिला. पण शिवसेनेला कमी निधी दिला. आम्ही मतदारसंघात कामं कशी करायची? असा सवाल करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपशी हात मिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. सत्तेत शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद आलं. पण त्या बदल्यात भाजपने महत्त्वाची खाती घेतली.
3 वर्षांपूर्वी -
विरोधकांना केंद्रीय एजन्सीच्या धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरील ईडी आणि सीबीआय केसेसचा इतिहास, वाचा सविस्तर
मुंबईस्थित बनारसमधील भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या अडचणी २०२० मध्ये प्रचंड वाढल्या होत्या. सीबीआयनंतर आता ते सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) निशाण्यावर होते. बँक ऑफ इंडियाच्या ६७ कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी ईडीने जुलै २०२० भाजप नेत्यासह अन्य सात जणांविरोधात चौकशी सुरू केली होती.
3 वर्षांपूर्वी -
भाजप नेते मोहित कंबोज यांना घेरून त्यांच्यावरील ईडी, सीबीआय केसेस संदर्भात प्रश्न न विचारता माध्यमांनी विरोधकांना घेरलं, नेटिझन्सकडून संताप
५७ कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जून २०२० मध्ये मुंबईतील पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने छापा टाकलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मोहित कंबोज यांचे निवासस्थान होते. त्यावेळी एका खासगी कंपनीसह आरोपींच्या निवासी आणि अधिकृत परिसरात शोध घेण्यात आला होता. या छाप्यात मालमत्ता, कर्ज, विविध बँक खाती आणि लॉकरच्या चाव्या यासह संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाचे सर्व्हे येताच, भाजपच्या अमराठी नेत्यांचं विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात धमक्यांचं तांडव सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत दिसणार या आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सेव्ह धिस ट्विट असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज झाले. यामध्ये सांस्कृतिक खात्याची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरमुनगंटीवार यांच्या खांद्यावर पडली आहे. मुनगंटीवार यांच्याकडे जबाबदारी येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापूढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरु करणार आहोत अशी माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
विनायक मेटे यांचं अपघाती मृत्यू प्रकरण | ट्रकचालक सापडला, पण प्रत्यक्षात तो ट्रक कुठे आहे? संशय बळावू लागला
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं.
3 वर्षांपूर्वी -
अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Vinayak Mete Passes Away | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं निधन
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाली. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी