महत्वाच्या बातम्या
-
बकरी ईद घरीच साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन
राज्यात कोरोनाव्हायरचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं परवडणारं नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असं आवाहन केलं आहे. च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
देश कोरोना संकटाशी झुंजत आहे आणि भाजप सरकार पाडण्यात व्यस्त, शिवसेनेची टीका
‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न - पोलीस, आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, सरकार आणि महापालिका टीमवर्क
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं.
5 वर्षांपूर्वी -
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम मिश्राला अटक
इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला होता. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकली, पवारांची कबुली
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. त्यावर शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचं कबूल केले.
5 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत RSS च्या स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, चित्रा वाघ यांनी फोटो शेअर केले
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकार पाडून दाखवाच, नंतर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करतो
राज्यातील महाविकास आघाडी केव्हाही कोसळू शकते असं सतत विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले की, सरकार पाडणार… सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच.’ ते पुढे म्हणाले की, तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या घेण्यात आला. या चाचण्यांचा अहवाल आला असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्याची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. सुदैवाने जया बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग', फडणवीसांचा राऊतांना टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे. यामुळे कोरोनाच्या लढाई दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नया है वहं..मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? - देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना औषधांचा काळाबाजार रोखणार, औषध वितरकांचे विभागवार फोन नंबर जाहीर
एका बाजूला कोरोनाचा धुमाकूळ वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांची राज्य सरकारनेही आता दखल घेतली असून औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी आता सरकारने थेट औषध वितरकांचेच विभागवार फोन नंबर जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे फोन नंबर जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
RSS स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्याने यश मिळतंय
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजभवन आणि जलसा सुद्धा सुरक्षित नाही, आता तरी UGC'ला धोका समजला का - उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणात कुणी कुणाचा गुरु नसतो, केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या जातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत ‘शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे’ असं जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर मोदींनी अनेक सभेत याचा दाखलाही दिला. पण, पहिल्यांदाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे वक्तव्य खोडून काढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाचा कहर, १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राजभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, पण त्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. खुद्द अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते आहे. दरम्यान, अभिनेत्री जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच ईस्ट वॉर्डच्या ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. एच ईस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार ( वय 57 वर्ष) यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खैरनार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष - आदित्य ठाकरे
करोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये वाढतो आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांनी करोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ते चांगले आहेत असं WHO ने म्हटलंय. अशातच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतल्या धारावी मॉडेलचंही कौतुक केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
RSS तसेच अन्य संस्थांच्या परिश्रमांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण - आ. नितेश राणे
जागतिक आरोग्य यंत्रणेचे WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी शुक्रवारी मुंबईच्या धारावी परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. कोरोनाचा प्रादुर्भावकितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, हे धारावीने सिद्ध करून दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी