महत्वाच्या बातम्या
-
केंद्र सरकारच्या निकषांनुसार BMC रुग्णालयांसाठी बॉडी बॅग्जची खरेदी - महापालिका
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणा-या ‘बॉडी बॅग्स’ या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असं बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सदरहू बॉडी बॅग्स खरेदी करण्यासाठी संकेतस्थळाच्या मार्फत खुल्या पद्धतीने तीन वेळा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली. 10 एप्रिल 2020 रोजी मागविण्यात आलेल्या पहिल्या स्वारस्याच्या अभिव्यक्तीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे 21 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली परंतु त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे 2 मे 2020 तिसऱ्यांदा स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यात आली होती, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनचे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्यात पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. युसूफ मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन याचा भाऊ होता.
5 वर्षांपूर्वी -
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहता येणार
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या काळात कर्तव्य बजावताना आपला जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटूंबासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कुटुंबांना सरकार ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी निवासस्थानात राहता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतले रुग्णालयाबाहेरचे १ हजार मृत्यू का लपवले?...फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा टेंडर घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप
याबाबत नितेश राणेंनी म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी याठिकाणी हजारो बेड्स उपलब्ध केल्याचं सांगण्यात येते, मग हे बेड्स खरचं कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आहेत का? कोणत्याही प्रकारचे टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारली जात आहे, त्याठिकाणी फक्त बेड्स आहेत, बाकीच्या उपकरणांचे काय, डॉक्टर, नर्स या सुविधांचे काय? हे कोणाच्या सांगण्यावरुन होत आहे, मित्रपरिवाराला खुश करण्यासाठी कोविड सेंटर उभारली जात आहे, या लोकांची नावे विधानसभेत उघड करणार आहे. रात्री ८ नंतर ज्या लोकांसोबत बसता त्यांना खुश करण्यासाठी हे सुरु आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ कारण्याबाबतचा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याच मुद्यावरून प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
अक्षय तू कार वापरणं बंद केलं आहेस का? वर्तमानपत्र वाचत नाहीस का? - जितेंद्र आव्हाड
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून आज सलग १९व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.०२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यासह राजधानीत डिझेलच्या दराने पहिल्यांदाच ८० रुपयांचा टप्पा पार केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, तर अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी साहेबांवर किती वेळा घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादी-काँग्रेसवाले बोलले आहेत- निलेश राणे
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
मनसेकडून दम मिळताच T-Series कंपनीने पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचा दरारा कामय असल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांची मागणी भारतीय म्युझिक कंपनी T-Series नं मान्य केली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ असलम यानं गायिलेलं गाणं ‘किंना सोना’ हे T-Series कंपनीच्या यू-ट्यूब चॅनेलवरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यात येणार नाही, असंही T-Series कंपनीनं राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांवरील पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही...पक्षानेच कान टोचले
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले...गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल - आव्हाड
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीवरून टीका होताच स्पष्टीकरण प्रसिद्ध
नथुराम गोडसे नाट्य साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार, सगळा घटनाक्रम डोक्यात - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्या म्हणण्यानं राज ठाकरे काही करतील, असे ते व्यक्ती नाहीत - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या शासकीय सुरक्षारक्षकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेजण उपचारानंतर कोरोनातून बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, काही दिवस शिवसेना भवन बंद ठेवण्याचा निर्णय
संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या आणि देशातही अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत आता थेट मुंबईतील शिवसेना भवन या वास्तूपर्यंत येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊत ग्रेट संपादक आहेत, उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील - चंद्रकांत पाटील
गलवान खोऱ्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांना बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही परिस्थिती चांगली आहे, असे सरकार कसे काय म्हणत आहे, असा सवालही त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी