महत्वाच्या बातम्या
-
जिओ TV व गुगल मीट ऑनलाइन माध्यमांच्या पायलट प्रोजेक्टचे मुख्यमंत्र्यांना सादरीकरण
राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडे कोरोनामुक्त, डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते ब्रीचकँडी रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
5 वर्षांपूर्वी -
CET परीक्षा पुढे ढकलल्या, उदय सामंत यांची माहिती
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्क स्मशानभूमीत कोरोना मृतांवर मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार, स्थानिक धुराने त्रस्त
राज्यात कोरोनाबाधितांसोबत कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. याचा परिणाम आता शहरातील स्मशानभूमीवर होताना दिसत आहे. सातत्याने क्षमतेपेक्षा जास्त कोविड मृतदेहांचे दहन केल्याने दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. या स्मशानभूमीत दादर आणि परिसराव्यतिरिक्त लांबच्या रुग्णांचाही अंत्यविधी करण्यात येतो. अंत्यविधीवेळी होणाऱ्या धुराचा परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
5 वर्षांपूर्वी -
आशा सेविकांच्या मासिक मोबदल्यासंदर्भात अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र
‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पीककर्जावरून शेतकऱ्यांना बँकांकडून अपमानास्पद वागणूक; भाजपची आंदोलनाची घोषणा
पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भाजप सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करेल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील S वॉर्डमधील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग व पवई परिसरात कोरोना रूग्ण संख्या वाढतेय
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा मुलगा पंतप्रधान बनणार आणि जॅकेट शिवायला टाकली खासदारांनी
शिवसेनेचा काल ५४वा वर्धापन दिन पार पडला. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन काल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी...भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय - संजय राऊत
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचं सावट...राम कदम यांचा दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करणं टाळलं जात आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता दहीहंडीवर देखील कोरोनाचं सावट आलं आहे. भाजप नेता राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोरोनाचं संकट पाहता दहीहंडीला हजारो लोकांची गर्दी जमा होणार आहे. हे टाळण्यासाठी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद - मुंबई पालिका आयुक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मुंबईकरांप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि धाडस यामुळेच मला चार दिवसात नोंद नसलेल्या ८६२ कोरोना मृत्यूंचे विश्लेषण करता आले अशी कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एका खासगी रु्ग्णालयात एकाच दिवशी १६ मृत्यू झाल्याची माहिती मला आकडेवारीवरून दिसली. ६ जूनच्या त्या आकडेवारीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे माझ्या लक्षात आले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; नाराजीचा विषयच नाही - बाळासाहेब थोरात
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या महाविकासआघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे भर पडत होती. मात्र, आता या सगळ्या वादावर खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पडदा टाकला असून ‘काँग्रेसच्या नाराजीचा इथे विषयच नाही. पण काही विषय असतात की ज्यावर नियमित बैठकांमध्ये चर्चा करता येत नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महत्त्वाचं आवाहन
यंदाचा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात गुरुवारी मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार - आरोग्यमंत्री
खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळेंचं कोरोनामुळे मुंबईतील इस्पितळात निधन
महाराष्ट्रात काल दिवसभरात 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 10 हजार 744 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात तब्बल 178 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या 4 हजार 128 इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सध्याच्या परिस्थितीत मुंबईत येण्याचे धाडस नाही - नितीन गडकरी
मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृध्दपकाळाने निधन
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. १६ मे रोजी दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आणि एका महिन्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
5 वर्षांपूर्वी