महत्वाच्या बातम्या
-
सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा - आ. राम कदम
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन रुळावर येणार
एवढ्या दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नायर रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची सुखरुप प्रसूती, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं कौतुक
मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ‘कोरोना कोविड १९’ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविडबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
मध्य रेल्वेकडून लोकल ट्रेन पुन्हा सुरू होण्याबाबत स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशीरा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणापलीकडे नाते टिकून ठेवणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी अशा दिल्या शुभेच्छा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊतांनी ट्विट करून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत एकाच दिवशी चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखाचा आकडा पार केला आहे. काल दिवसभरात नव्या ३ हजार ४९३ रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या आता १ लाख १ हजार १४१ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय काल १ हजार ७१८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी देखील गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीच्या काळात भ्रष्ट अधिकारी स्वत:च्या तुमड्या भरुन घेत आहेत - मनसेचा आरोप
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिमुकलीच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार, चिमुकलीच्या पित्याने मानले आभार
जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेंकडून बंधू धनंजय मुंडेंच्या तब्येतीची चौकशी
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते.
5 वर्षांपूर्वी -
SRA'च्या प्रत्येक प्रकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार - जितेंद्र आव्हाड
यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. सध्या राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या स्थितीमुळे आरोग्य विभागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१४ जूनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांसाठी पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांचे ३ सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. उपचारानंतर हे तीनही सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज, बैठकीत चर्चा
‘हे सरकार शिवसेनेचे सरकार’, असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तर काँग्रेसचे मंत्रीच नाराज असल्याचे समजते. याचसाठी आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावली
5 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल - आयआयटी अहवाल
दरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक वाढेल. आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. अभ्यासाचा असा दावा आहे की आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईने रुग्ण संख्येत चीनमधील वूहानला मागे टाकले
मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण ५०,३४० रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५१,००० वर जाऊन पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला भरमसाट बिल, मनसेकडून सुटका, पोलिसात तक्रार दाखल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने एकीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक खाजगी इस्पितळं रुग्णांवर भरमसाठ बिलं आकारात असल्याचं देखील समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BMC पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता शिरीश दीक्षित यांचा कोरोनाने मृत्यू
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'या' वेळेत खुली राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली
मागील अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी