महत्वाच्या बातम्या
-
परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी? अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करा - राज ठाकरे
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबईतील जीएसबी मंडळाकडून यंदाचा गणेशोत्सव रद्द
महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. त्यातच बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त येत असतात. कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि सोशल डिस्टन्सिंग कसे राखायचे, असा पेच सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज ४ वाजता देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची पत्रकार परिषद
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून होत असतानाच राज्य सरकार अस्थिर करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मातोश्रीवर महत्वाची बैठक; विरोधक-सत्ताधारी बैठका
एकीकडे राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना दुसरीकडे लवकरच एक राजकीय भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस सोमैयांना म्हणाले, तो व्हिडिओ जुना आहे आणि कोरोनाशी संबंध नाही
मुंबईमध्ये रविवारी एक हजार ७२५ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या ३० हजार ३५९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ९८८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयित रुग्णांची संख्या २५ हजार १३१ इतकी झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बऱ्या झालेल्या ५९८ जणांना रविवारी घरी पाठवण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वेमंत्री रात्रभर उगाचच ट्विट करत होते, इथे रात्री ९ नंतर झोप महत्वाची - आ. भातखळकर
स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीत सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष टोकाला; शरद पवार राज्यपालांच्या भेटीला
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या लाईफलाईन सेवेबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतून IFSC बाहेर हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं - संजय राऊत
महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतानाच राज्यात राजकारणही पेट घेत आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी भाजपने ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध ठिकाणी या आंदोलनाला सुरूवात झाली असून अनेक बडे नेते हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसनं याला ‘भाजप बचाओ’ आंदोलन असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही, तृतीयपंथी सुद्धा माणूसच - प्रकाश आंबेडकर
गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं अशा शब्दांत आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांचा खरपूस समाचार घेतला.
5 वर्षांपूर्वी -
जिथे नातेवाईक मृतदेहाजवळ जातं नाहीत, तिथे तिने ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले
महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.
5 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन
प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून आयसोलेशन केंद्राला भेटी; तरी चंद्रकांतदादा म्हणतात त्यांनी स्वतःला घरी क्वारंटाइन केलंय
कोरोना संसर्गनिवारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरले आहेत. त्यांनी एक नव्हे दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. गेली दोन महिने त्यांनी स्वतःला ‘मातोश्री’मध्ये क्वारंटाइन करून घेतले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. दीर्घकाळ कोल्हापूर जिल्ह्यात आले नसल्याने टीका करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर
१९ मे रोजी वडाळ्यातल्या एका एसआरएच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सोमय्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे बेड उपलब्ध नव्हते. संबंधित रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला घरी सोडण्यात आलं. रुग्णाच्या शेजाऱ्यांनी क्वांरिटन करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या नाहीत. त्यांची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास किमान ती राहत असलेला मजला सील केला जावा, असं नियम सांगतो. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही नियम पाळला नाही.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: मरोळ PTS'मध्ये मुंबई पोलिसांसाठी विशेष कोरोना उपचार केंद्र
राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकार अपयशी; भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
कोरोना व्हायरसचे संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील राजकीय संकटावर पडदा पडला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडीचे पत्र स्वीकाराले आणि सदस्यत्वाची शपथही घेतली.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत कोरोना पसरतोय; २४ तासांत ४४ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे कामावर; बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी 'मुंबईकर फस्ट'
मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवार १८ मेपासून बेमुदत बंद पुकारला खरा. पण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक ऐकली नाही आणि कामावर आले. संपात सहभागी न होण्याचं कामगारांनी ठरवलं आहे. संपापेक्षा या कामगारांनी आपल्या सेवेला महत्व दिल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होतं आहे.
5 वर्षांपूर्वी