महत्वाच्या बातम्या
-
प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, स्तंभलेखक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी निधन झाले. रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मतकरींच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वानखेडे स्टेडिअम ताब्यात न घेण्यामागील कारण आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट
क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांकडून मुंबईतील एमएमआरडीए मैदानातील क्वारंटाईन केंद्राची पाहणी
देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून गोरेगाव नेस्को मैदानावरील १००० खाटांच्या कोरोना केंद्राची पाहणी
देशभरात कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा अनुभव सांगणारं शिल्पा पटवर्धन यांचं मनोगत; तुमचा आत्मविश्वास वाढवेल
सध्या समाज माध्यमांवर कोरोनासंबंधित समोर येणाऱ्या गोष्टी या सामान्यांचा आत्मविश्वास ढासळवणाऱ्या आहेत हे नक्की. अशा परिस्थतीत सामान्यांचा कोरोनाविरुद्ध लढ्यात आत्मविश्वास वाढेल असा गोष्टी जवळपास नसल्यात जमा आहेत. मात्र सध्या समाज माध्यमं आणि व्हाट्सअँप’वर मुंबई दादर येथील पटवर्धन कुटुंबीयांचा व्हयरल होणारा अनुभव तुमचा कोरोनाविरुद्ध आत्मविश्वास नक्कीच वाढवेल…स्वतः पटवर्धन कुटुंबातील शिल्पा पटवर्धन यांनी सांगितलेला अनुभव अगदी जसाच्या तसा आम्ही देत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आमदार झाले, सोमवारी घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा - आ. आशिष शेलार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राने मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? अशी विचारणा केली आहे. हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्पितळात बेड्स आहेत की नाही हे समजत नसल्याने कोरोना रुग्ण बाहेरच
कोरोनामुळे बुधवारी मुंबईत तब्बल ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यानचे आहेत. २२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २४ रुग्ण पुरुष आणि १६ रुधारावीमध्ये कोरोनाची ६६ नवी प्रकरणे आढळून आली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २८ एवढा झाला आहे. दादरमध्ये ८ नवी प्रकरणे आढळून आली. २१ कोरोनाबाधितांना सोडण्यात आले आहे. ग्ण महिला होत्या.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ - मंत्री जितेंद्र आव्हाड
कोरोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर कोरोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. याच विषयाकडे लक्ष देण्यासाठी राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला साद घातली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्णब यांची चौकशी करणाऱ्या पोलिसाला कोरोनाची लागण; मग ते स्टुडिओत कसे? काँग्रेस
वांद्रे येथे जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग दिल्याप्रकरणी रिपब्लिकन भारत वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रजा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीचे सचिव इरफान अबुबकर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला होता.
5 वर्षांपूर्वी -
धारावी-वरळीत कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार औषध
मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे. सध्या धारावी आणि वरळी हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळं येथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला.
5 वर्षांपूर्वी -
पक्ष मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन झाला, पण एकाचाच उद्धार झाला - भाजप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्याकडे १४३ कोटी २० लाख ७४ हजार ७६३ रुपयांचे उत्पन्न दाखवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
यूपीच्या मजुरांचा प्रवास, मुख्यमंत्र्यांऐवजी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला
मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
5 वर्षांपूर्वी -
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
कोरोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने रविवारी दिवसभर महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
5 वर्षांपूर्वी -
जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात...सुखरूप घरी परतले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. ठणठणीत बरे होऊन ते आज घरी परतले आहेत. आपल्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी लढण्यास पुन्हा त्याच जोमानं सज्ज होऊया, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: सेव्हन हिल्स इस्पितळात ६० वर्षीय कोरोना रुग्णाची फास लावून आत्महत्या
मुंबईत आणखी ७४८ आणखी करोनाग्रस्त सापडले असून रुग्णांचा आकडा ११,९६७ वर गेला आहे. गेल्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढले आहेत. तर आज नव्याने २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४६२ वर गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकं कोरोना पेक्षा सरकारी रुग्णालयाला जास्ती घाबरत आहेत - संदीप देशपांडे
राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
सायन रुग्णालयात नवे प्रभारी, नवे पालिका आयुक्त, मग महापौरांचं काय? - आ. नितेश राणे
राज्य शासनाचे आदेश निघाल्यानंतर जराही वेळ न घालवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इकबाल सिंह चहल यांनी रात्रीच मुंबई पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील करोनाचं संकट लक्षात घेऊन चहल यांनी सूत्रे स्वीकारताच रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन करोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्याचे कळते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली
राज्यातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी